एक मैफ़ल स्वप्नातली..
तिन्हीसांजेची वेळ होती आणि पं.हरीप्रसाद चौरासीया ह्यांच्या बासरीतून पुरीया कल्याण रागातील सूर मोहून गेले. तासभर सर्वजण शांत चित्ताने बासरीच्या सूरांत तरंगत होतो. हा बासरीच्य सूरांचा प्रवाह असाच चालू रहावा असे वाटत असतानाच पं.शिवकुमार शर्मा ह्यांच्या संतूर वादनाच्या सूरांच्य नावेतील प्रवास सुरू झाला. तबल्यावर संगत होती उस्ताद झाकीर हुसैन ह्यांची. त्या संतूर-तबल्याची अनोखी पेशकश सर्वांना अनोख्या विश्वात घेऊन गेली . दूसरे काही विचार मनाला शिवण्याचा प्रयासही करत नव्हते. मन एखाद्या स्वच्छ तळ्यातील संथ पाण्यासारखे निर्मळ आणि शांत झाले होते.
वीज कडकडावी तशी राजन-साजन मिश्रा आणि परवीन सुलताना ह्यांनी मैफ़िलीत "जान" आणली. परवीन सुलताना ह्यांचं "रसिका तुझ्याचसाठी.." लोकांची मनं जिकून गेलं.
आणि मन सप्त-स्वरांत गूंतत चाललेले असतानाच अचानकपणे "बोलावा विठ्ठल.." हे स्वर कानी पडले. किशोरी आमोणकर ह्यांनी स्वर मंचाचा ताबा घेतला होता. पुढे "ज्ञानोबा माऊली तुकाराम.." ह्या गजराच्या तालावर आम्ही नकळतपणे डुलायला लागलो होतो. गजर वेग घेत होता आणि आम्ही "भान हरपणे" काय असते हे अनुभवत होतो.
आता सर्वांना पंढरीच्या दर्शनाची ओढ लागली होतीच. आणि स्वरांच्या माध्यमातून ते दर्शन घडवणे केवळ एकच व्यक्तीला शक्य आहे - पं.भिमसेन जोशी ! "देव विठ्ठल तिर्थ विठ्ठल.." हे शब्द कानी पडले आणि निर्मळ मनाला एक अनोखे पावित्र्य लाभले. पांडूरंगाच्या सांन्निध्यात वेळेचे भान हरपले. "ईंद्रायणी काठी..", "माझे माहेर पंढरी..", "जाता पंढरीसी सुख वाटे जीवा..", "काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल.." हे अभंग आम्हा सर्वांना पंढरपूरला घेऊन गेले. खरं सांगतो, मनाला एवढी शांती या आगोदर कधी मिळाली होती का याचा मी विचार करत होतो.
त्या निर्मळ, पवित्र तळ्यात उगवत्या चंद्राचे प्रतिबींब दिसावे आणि काही वेगळाच आनंद व्हावा.