Wednesday, February 22, 2006

झाला महार पंढरीनाथ - ग.दि.मा आणि बाबूजी

ग.दि.मांनी लिहिलेलं आणि बाबूजींनी संगीत दिलेलं एक गावरान गीत -

झाला महार पंढरीनाथ
काय द्येवाची सांगू मात
झाला महार पंढरीनाथ ॥धॄ॥

नेसला मलीन चिंधोटी
घेतली हातामधी काठी
घोंगडी टाकीली पाठी, टाकीली पाठी, टाकीली पाठी
करी जोहार दरबारात
झाला महार पंढरीनाथ ॥१॥

मुंडाशात बांधिली चिठी
भेटतो दुरून जगजेठी
तामाजीनं विकली जी कोठी, विकली जी कोठी, विकली जी कोठी
त्याचं घ्यावं दाम पदरात
झाला महार पंढरीनाथ ॥२॥

खळखळा ओतील्या मोहरा
ह्याची मोजून पावती करा
ढीग बघून चमकल्या नजरा, चमकल्या नजरा, चमकल्या नजरा
शहा घाली बोट तोंडात
झाला महार पंढरीनाथ ॥३॥

झाला महार पंढरीनाथ
काय द्येवाची सांगू मात
झाला महार पंढरीनाथ ॥धॄ॥

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home