Sunday, September 10, 2006

बटाट्याची चाळ आणि आ.अत्र्यांचे कौतुक पत्र

बटाट्याची चाळ - एक बहुरूपी खेळ
लेखन, दिग्दर्शन, संगीत, अभिनय - पु.लं.देशपंडे

मुंबईत बटाट्याच्या चाळीचे प्रयोग जोरात चालू होते. लोक तीन-तीन तास रांगेत उभे राहून पुढल्या अठवड्यात होणाऱ्या प्रयोगाची आगाऊ टिकीटे घेत असत. मुंबईत प्रयोग सुरु करण्या आगोदर पु.लं. नी लंडन मधील महाराष्ट्र मंडळाच्या मदतीसाठी "बटाट्याची चाळ" या पुस्तकातील काही प्रसंगांचे वाचन करायचे प्रयोग सुद्धा केले. "बटाट्याची चाळ" या एक पात्री प्रयोगाला यशवंतराव चव्हाण, पं. रविशंकर, दुर्गा खोटे अशा अनेक दिग्गज लोकांनी हजेरी लावली. अशाच एका प्रयोगाच्या वेळीस आचार्य अत्रे श्रोतांच्य पहिल्या रांगेत बसलेले. अत्र्यांना पाहताच पु.लं. थक्क झाले आणि भीतीपायी त्यांना चक्क पोटात गोळा आला. मध्यंतरात अत्रे पु.लं.ना भेटायला आले आणि पाठीवर थाप मारली. त्याच दिवशी रात्री दोन वाजता पु.लं.ना फोन आला - "कोण बोलतंय?"
"मी पु.लं.देशपांडे बोलतोय."
"अत्रे बोलतोय. काय करताय? "
"आता रात्री दोन वाजता आमच्या सारखी सज्जन मंडळी काय करणार? आपल्या घरी झोपलो होतो. "
"उद्याचा 'मराठा' वाचा. अत्ताच बटाट्याच्या चाळीवर लेख संपवला."
"(मनात) बाप रे!"

दुसऱ्या दिवशी म्हणजे ४ जुन १९६१ च्या "मराठा" या बातमी पत्रात "बटाट्याची चाळ" ह्यावर अग्रलेख छापून अला होता.

क्या बात है!
कौतुक करायची ही "अत्रे" पद्धत.