Wednesday, July 05, 2006

काटा रुते कुणाला ...

"हे बंध रेशमाचे" ह्या नाटकाच्या संगीत दिग्दर्शनाच्या वेळी रणजीत देसाई, शांताबाई शेळके आणि पं.जितेंद्र अभिषेकी ह्यांची चर्चा चालू होती. त्या वेळी एका गाण्याच्या भावोत्कटतेविषयी पंडीतजींनी विचार मांडला एका शेराच्या स्वरूपात.



लोग कांटों की बातें करते है,
लोग कांटों की बातें करते है,
हमने तो फूलोंसे जख्म खाये है।

शांताबाईंच्या मर्मातल्या मनाला ती भावना क्षणार्धात उकलली आणि त्यांनी गाणं रचलं -

काटा रुते कुणाला
आक्रंदतात कोणी
मज फ़ुल ही रुतावे
हा दैवयोग आहे...



सौजन्य: नक्षत्रांचे देणे, पं. जितेंद्र अभिषेकी यांच्यावर आधारीत कार्यक्रम