Thursday, January 05, 2006

आपलं नशीब

मला घरुन स्टेशन पर्यंत जाण्यासाठी रिक्षा शेअर करावी लागते. रिक्षेमध्ये आपल्या बाजुला सुंदर मुलगी बसावी असं खूप वेळा वाटतं. दिवसाची सुरूवात चांगली झाली की दिवसही चांगला जातो असं म्हणतात. हे खोटं नाही; मी स्वत: एक-दोनदा अनुभवलं देखील आहे.

एके दिवशी रिक्षा-स्टॅंड पासून काही अंतरावर असताना २ अतिशय सुंदर मुली ३ ऱ्या व्यक्तीची वाट पाहताना दिसल्या. "ती ३ री व्यक्ती आपणच, आजचा दिवस खूप सही जाणार यात काही वादच नाही!", अशी मनाल खात्री पटणार तेवढ्यात स्टॅंडच्या समोरच्या सोसायटीतून एक काका धावत आले आणि ....

मी आता बस-स्टोपवर बसची वाट बघत थांबलो होतो, आशा करीत की निदान त्यात तरी दिवसाची सुरूवात चांगली होवो. पण काही वेळाने माझ्या सर्व आकांक्षांवर पाणी फ़ेरत एक ओळखीचे गृहस्त मला म्हणाले ," अरे तुला माहीत नाही काय? आज बसचा संप आहे!"

आपलं नशीब!

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home